
नागपूर
गमावल्यावर
ऊन उतरल्यावर कधी
पाहू नये मागे
उगीच आणखी तोडू नये
पहाटेचे धागे
कोंबडयाने बांग दिली
तीच वेळ आपली
वाट खिशात घालून घ्यावी
तेव्हा नसते तापली
विचारुन घ्यावे सावलीला
वाजायचे असतात बारा
तिलाच मग घाई असते
आपला कुठे थारा
तेच नेमकं जमत नाही
बदलून जातो वेष
अधेमध्येमच होवून जातो
त्रिभूज प्रदेश
मुखाजवळ जाता जाता
पाणी काहीच उरत नाही
सागर असतो पुढे पण-
आपलं नसतं काही

बाजोरिया नगर, यवतमाळ
॥ गणराज्य दिनांची करणी ॥
राष्ट्रध्वज या भारताचा,
सदा राहील स्मरणी | अमर आहे,
गणराज्य दिनाची करणी ॥धृ॥
1947 साली, भारत देश, स्वतंत्र झाला |
अनेक महान, नेत्यांचा, मृत्यू झाला ॥
अशा अमर हुतात्म्याची,
आहे महान करणी ॥1॥
26 जानेवारी, 1 मे, 15 आगस्टला,
सर्वत्र झेंडा फडकतो ।
महान नेत्यांनी, दिलेल्या आहूतीने,
झाला देश विजयी तो ॥
अशा महात्म्यांची, नित असे,
सदैव अमर वाणी ॥2॥
माझी मातृभूमि, आई, प्रेमळ भारत माता ।
समस्त जनतेस, देई, आशिर्वाद मोठा ॥
अशा भारतभूमिची, वाणी,
नित असावी स्मरणी ॥ 3॥

आजनी, त. कामठी,
जि. नागपूर
थेंबाची रांगोळी
एकीकडे गणराजे
गणराज्य दिन चिरायू होवो
असे रस्तोरस्ती आणि
गल्लीबोळात जोरजोराने
ओरडतात तेव्हा
दुसरीकडे
26 दिवे जानेवारीचे
लावायला सांगितले तर
महागाईचे कारण दाखविणाऱ्यांना
आपल्या देशाविषयी प्रेम नाही
आपुलकी नाही
स्वाभिमान नाही
जर त्यांना
आपल्या देशाविषयी प्रेम आहे
आपुलकी आहे
स्वाभिमान आहे व राष्ट्रभक्ती आहे
तर त्यांनी फक्त एवढे करावे
26 थेंबाची रांगोळी
त्यांच्या दारापुढे काढावी,
एवढेच नव्हे तर
राष्ट्रीय एकात्मतेच्या रेषा
त्या थेंबाला जोडाव्यात आणि
आझादीचा रंग त्या
रांगोळीमध्ये भरावा…